गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (16:34 IST)

खाद्यतेलाचे झालं स्वस्त

edible oil
Mustard oil Rate Today (3rd August 2022) :भारतीय बाजारपेठेत वाढत्या महागाईमुळे घबराट निर्माण झाली आहे. महागाईबाबत विरोधक सातत्याने आंदोलने करत आहेत, मात्र सरकारला काहीच फरक पडत नाही. असे असतानाही सरकार सातत्याने धक्के देत आहे. बाजारात प्रत्येक वस्तू महाग होत आहे. सीएनजी आणि पीएनजीपासून ते एलपीजी गॅस सिलिंडर आणि खाद्यपदार्थांचे दरही वाढत आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलियम पदार्थांचे दर स्थिर असताना ही स्थिती आहे. मात्र, सध्या उत्तर प्रदेशमध्ये मोहरीच्या तेलाच्या दरात दिलासा मिळाला आहे. आज 3 ऑगस्ट रोजी यूपीमध्ये मोहरीच्या तेलाची किंमत 157 रुपये प्रति लिटर आहे. तर 1 ऑगस्ट रोजी ते 160 रुपये प्रतिलिटर होते.
 
 जागतिक बाजारात घसरण झाल्याने त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या किंमतींवर झाला आहे. जागतिक बाजारात घसरण झाल्याने भारतीय बाजारात खाद्यतेलाचे भाव घडगडले आहेत. भारतीय बाजारात भूईमुगाचं तेल वगळता इतर तेलाच्या दरात कपात झाली आहे.