शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (12:11 IST)

सोन्याच्या किंमतीत घसरण

कोरोना व्हॅक्सीनच्या वृत्तादरम्यान जगभरात इक्विटी बाजारांच्या रूपात सोन्याच्या किंमती आज भारतीय बाजारात घसरल्या. एमसीएक्सवर फेब्रुवारीचा सोने वायदा 0.6% घसरून 49815 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर चांदी 1.2% घसरून 64,404 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.
 
सोने मागील सत्रात 50109 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावावर बंद झाले होते आणि आज 259 रुपयांच्या घसरणीसह 49850 रुपयांच्या भावावर खुला झाला. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, व्हॅक्सीन येणार असल्याचे बातम्यांनी सोन्याच्या किंमती कमजोर पडत आहेत. तर मागील सत्रात सोने 0.2% जास्त होते, तर चांदीत 0.6% ची घट झाली होती. कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी व्हॅक्सीनबाबत सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण येत आहे.