शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (15:20 IST)

भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल ! पालेभाज्यांची आवक वाढली, दर कोसळले

पुण्याच्या बाजार समितीमध्ये कोथिंबिर, मेथी आणि पालकाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या पालेभाज्यांचे दर उतरले आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी अवकाळी पावसाच्या परिणामामुळे कोथिंबीर जुडी किरकोळ बाजारात अगदी ५०-६० रूपयांपासून ८० ते १०० रूपयांपर्यंत गेली होती.
मात्र, आता आवक वाढत आहे. त्यामुळे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मात्र, पालेभाज्या दर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
बाजारात रविवारी कोथिंबीरची १ लाख २५ हजार तर मेथीची ४० हजार जुड्यांची आवक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून पालेभाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.
मागील महिन्यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मेथी, कोथिंबीरची जुडी ६० ते ८० रुपयांपलीकडे गेले होते. आता दर बऱ्यापैकी आवाक्यात आले आहेत.
मेथीची जुडी १० ते १५ रुपये तर, कोथिंबीरची जुडी १० ते १५ रुपये, पालक ८ ते १० आहे. म्हणून पालेभाज्या स्वस्त मार्केट यार्डात आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीर, शेपू आणि पालक या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे.
यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. हिरव्या पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने गृहिणींची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. – अमोल घुले, व्यापारी काय आहेत पालेभाज्यांचे दर
 
पालेभाज्या मार्केट
कोथिंबीर ३ ते ६ १० ते १५
मेथी ५ ते ७ १० ते १५
पालक ५ ते ८ ८ ते १०
शेपू ७ ते ८ ८ ते १०
करडई ६ ते ८ ८ ते १०
चवळी ५ ते ६ १० ते १२