शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (13:22 IST)

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोलवरील VAT 8 रुपयांनी कमी, जाणून घ्या आता काय आहे नवीन किंमत

दिल्ली सरकारने पेट्रोलच्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी राज्य सरकारने राजधानीत पेट्रोलवरील व्हॅट कमी केला आहे. केजरीवाल सरकारच्या या निर्णयानंतर दिल्लीत पेट्रोल सुमारे 8 रुपयांनी स्वस्त होणार असून, त्यानंतर दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 95.97 रुपये प्रति लिटर होईल. आज मध्यरात्रीपासून पेट्रोलचे नवे दर लागू होणार आहेत.
 
कॅबिनेट बैठकीत घेतलेला निर्णय
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. बैठकीत केजरीवाल यांनी पेट्रोलवरील व्हॅट 30 टक्क्यांनी कमी करून 19.40 टक्के केला आहे. आज रात्रीपासून पेट्रोल भरणाऱ्यांना 8 रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळणार आहे.
 
केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली आहे
गेल्या 27 दिवसांपासून सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करत नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकले होते. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी पेट्रोलच्या दरात उत्पादन शुल्क कमी केले होते, त्यानंतर पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले होते.
 
आज पेट्रोलचा दर 103.97 रुपये होता
आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे, मात्र मध्यरात्रीपासून पेट्रोलचे नवे दर जाहीर होतील, त्यानंतर तुम्हाला पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त मिळेल.