शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (18:46 IST)

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्या चांदीचे नवे दर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात घसरण झाली. आज सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचा भाव 47500 रुपयांच्या जवळ आला आहे. आज सोन्याचा भाव 265 रुपयांनी घसरून 47,567 रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा भाव 59,801 रुपये प्रति किलो झाला .आजचा सोन्याचा दर.24 कॅरेट सोन्याचा भाव 47,567 रुपये झाला. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 47,832 रुपयांवर बंद झाला. आज भाव 265 रुपयांनी घसरला. 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 47,376 रुपये होती. आता 22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 43,571 रुपये आहे. तर, 18 कॅरेटची किंमत 35,675 रुपयांवर पोहोचली. आज 14 कॅरेट सोन्याचा भाव 27,827 रुपये होता.सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर 59,801 रुपये होता. काल चांदीचा दर 60,435 रुपयाला होता. चांदीचे दर देखील 634 रुपयांनी घसरले.