शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (08:40 IST)

'रिलायन्स' जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रॅन्ड

अ‍ॅपल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रॅड आहे. आता ऑईल क्षेत्रापासून ते टेलिकॉम क्षेत्रात सर्वच ठिकाणी यशाची शिखरं गाठणाऱ्या मुकेश अंबानी यांचा रिलायन्स हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रॅन्ड ठरला आहे. 
 
रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरी, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. रिलायन्सनं दुसऱ्या क्रमांकासाठी सर्वात मोठी झेप घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी रिलायन्सनं आपल्याला सिद्ध केलं असल्याचं फ्युचब्रॅन्ड इंडेक्स २०२० ची यादी जाहीर करताना सांगण्यात आलं. रिलायन्स ही कंपनी भारतात सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नाविन्यपूर्ण उत्पादनं, उत्तम ग्राहक अनुभव आणि वृद्धी यासोबत कंपनी जोडली गेली असून कंपनीचे सर्वांसोबतच भावनिक संबंध आहेत, असंही यावेळी नमूद करण्यात आलं.
 
हे आहेत टॉप १० ब्रॅन्ड : अ‍ॅपल, रिलायन्स, सॅमसंग, एनविडिया, मोताई, नायकी, मायक्रोसॉफ्ट, एएसएमएल, पेपाल, नेटफ्लिक्स.