1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2020 (15:26 IST)

जीओ पुढच्या वर्षी 5G नेटवर्क आणणार

संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी याबाबत माहिती दिली. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावेळी रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.
 
“5G नेटवर्कसाठी आवश्यक परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी जिओ सज्ज आहे,” असं अंबानी म्हणाले. इतकंच नाही तर हे तंत्रज्ञान आपण जगामध्ये निर्यात करण्याक्षम असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा दाखला देत जिओ याच दिशेने वाटचाल करत असल्याचे आणि संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा केवळ वापरच नाही तर जगाला डिजिटल तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवल्याचंही यावेळी नमूद केलं.