बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जून 2018 (08:51 IST)

ऑडीच्या सीईओला अटक, डिझेल कार फसवणूकीचा आरोप

जगविख्यात ऑडी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रुपर्ट स्टॅडलर यांना त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. फोक्सवॅगनच्या डिझेल कारमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या कारवाईमुळे जगभरातील कार उद्योगात खळबळ उडाली आहे. ऑडी ही जर्मनीतील जगविख्यात कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीनीचीच फोक्सवॅगन ही पेरेंट कंपनी आहे. 
 
युरोपातील ग्राहकांना विकण्यात आलेल्या डिझेल कारमध्ये स्टॅडलर यांनी बनावट सॉफ्टवेअर टाकून त्यांची फसवणूक केल्याचे गेल्याच आवडय़ात उघडकीस आले होते. फोक्सवॅगनच्या डिझेल कारमधून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षापासून येत होत्या. मात्र, कंपनीने सॉफ्टवेअरच्या मदतीने ६ लाख कारचे प्रदूषण रोखल्याचे सांगितले. वास्तविक सॉफ्टवेअरमध्येच छेडछाड करून प्रदूषण कमी असल्याचा घोटाळा कंपनीने केला.