गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 18 जून 2018 (13:39 IST)

देशातील ह्या सात बँका देतात सर्वात लवकर आणि स्वस्त लोन, जाणून घ्या यांच्याबद्दल

युवा पिढीतील लोक आपले खर्च पूर्ण करण्यासाठी लहान वयातच क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन घेतात. पर्सनल लोन घेणे आजकल फार सोपे झाले आहे. काही बँका एटीएम किंवा ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर काही तासानेच पर्सनल लोन देतात. एवढंच नव्हे तर आयसीआयसीआय बँक तर मात्र तीन सेकंदातच लोन राशी तुमच्या खात्यात ट्रांसफर करून देते. अशात जाणून घ्या सध्या कोण कोणत्या बँका तुम्हाला पर्सनल लोन कमी व्याजात आणि लवकर ट्रांसफर देण्याची सुविधा देत आहे.
 
युनियन बँक ऑफ इंडिया: युनियन बँक ऑफ इंडिया ग्राहकांना पाचच लाख ते दहा लाखापर्यंतच्या पर्सनल लोनची पेशकश करते. येथे व्याज दर विभिन्न मापदंडांच्या आधारावर 10.35 टक्के ते 14.40 टक्केपर्यंत राहते. हे लोन फेडण्याची अधिकतम मुदत पाच वर्षाची असते.
 
आयसीआयसीआय बँक: आयसीआयसीआय बँक लग्न, होम रेनोवेशन, टॉप अप इत्यादीसाठी पर्सनल लोनची सुविधा देते. ग्राहक या बँकेकडून 20 लाखापर्यंतचे अधिकतम लोन घेऊ शकतात. याची व्याज दर 10.99 टक्के ते 22 टक्के वार्षिक असते. सांगायचं म्हणजे ही बँक फक्त तीन सेकंदाच्या आत लोन राशी तुमच्या खात्यात ट्रांसफर करून देते. या लोनची मुदत देखील पाच वर्ष इतकी असते.
 
कोटक महिंद्रा बँक: कोटक महिंद्रा बँक ग्राहकांना 50 हजार रुपये घेऊन 15 लाखापर्यंतचे लोन उपलब्ध करवून देतो. याची व्याज दर 10.99 टक्के  ते 24 टक्के पर्यंत आहे.
 
इंडसइंड बँक: इंडसइंड बँक पर्सनल लोन 11.25 टक्के ते 23 टक्के पर्यंतची व्याज दरावर मिळवून देते. लोन एक ते पाच वर्षाच्या अवधीसाठी घेऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे बँक लोनसाठी डोरस्टेप बँकिंगची सुविधा देखील देते.
 
भारतीय स्टेट बँक: एसबीआयमध्ये पर्सनल लोनवर व्याज दर 11.15 टक्के ते 15.15 टक्के वार्षिक असत. येथे व्याज दर विभिन्न मानदंडांच्या आधारावर प्रभावी होते. एसबीआय ग्राहकांना 10 लाख रुपये पर्यंतचे पर्सनल लोन उपलब्ध करवून देतो.
 
बँक ऑफ इंडिया: बँक ऑफ इंडिया ग्राहकांना 11.9 टक्के ते 13.9 टक्के व्याज दरावर पर्सनल लोन उपलब्ध करवून देतो. हे ग्राहकांना 10 लाखापर्यंत लोन देतो. हे लोन फेडायची मुदत पाच वर्षांपर्यंत असते.
 
बंधन बँक: बंधन बँकमधून एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकता. ही बँक दोन दिवसांमध्ये लोन राशी तुमच्या खात्यात ट्रांसफर करून देते. सांगायचे म्हणजे येथे पर्सनल लोनसाठी व्याज 14 ते 17.86 टक्के वार्षिक असते. या लोनची मुदत एक ते तीन वर्षांपर्यंत असते.