शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

१७ वर्षांत प्रथमच स्टेट बँकेला तोटा

business news
स्टेट बँकेला यंदा तिमाही तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे. वाढते थकीत कर्जे व त्यासाठी करावी लागणारी तरतूद यामुळे बँकेला गेल्या १७ वर्षांत प्रथमच तिमाही तोटा सहन करावा लागला आहे.
 
चालू वित्त वर्षांच्या प्रारंभीच पाच सहयोगी बँका व भारतीय महिला बँकांचे मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरण अस्तित्वात आले. तर तोटय़ातील वित्तीय निष्कर्षांच्या कालावधीतच सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला रजनीश कुमार यांच्या रूपात नवा अध्यक्ष मिळाला. दुसरीकडे स्टेट बँक समूहाने तिचे ऑक्टोबर ते डिसेंबर या २०१७-१८ मधील तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष शुक्रवारी जाहीर केले. यात बँकेला १,८८६.५७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.