मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (10:56 IST)

पोस्टाच्या या योजनांमध्ये छोटी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवा

कोरोनाच्या Corona संकटकाळात सामान्य नागरिकांसाठी मोठी बचत करणे तसे कठीण आहे. मात्र पोस्ट ऑफिस (Post Office)च्या काही छोट्या बचत योजना तुमच्या मदतीला येऊ शकतात. यातून तुम्ही घरखर्च देखील चालवू शकता त्याचबरोबर भविष्यासाठी थोडीफार बचत देखील होईल. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये (Post Office saving Schemes)  गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये चांगला परतावा मिळतो आणि सरकारी गॅरंटी देखील असते. त्याचप्रमाणे इतर योजनांच्या तुलनेत यामध्ये जोखीम कमी असते.
 
आता पोस्टात बचत खाते असणारे देखील नेटबँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतात. पोस्टाच्या बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग उपलब्ध असल्याने अनेक कामं घरबसल्या होऊ शकतात. या सुविधेअंतर्गत तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवू शकता किंवा तुमची शिल्लक रक्कम देखील तपासू शकता. त्याचप्रमाणे इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आरडी, पीएफ, एनएससी या योजनांबाबतची कामं देखील पूर्ण करता येतील.
 
नेट बँकिंग म्हणजे काय?
इंडिया पोस्ट बचत खाते असणाऱ्या खातेधारकांना नेटबँकिंग सेवा वापरण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. याकता तुमचे वैध एकल किंवा संयुक्त खाते असणे आवश्यक आहे. तसंच केवायसी संबंधित कागदपत्रे, सक्रीय एटीएम कार्ड, खात्याशी लिंक्ड मोबाइल नंबर, रजिस्टर्ड मेल आयडी, रजिस्टर्ड पॅन नंबर इ. बाबी अपडेट असणे गरजेचे आहे.
 
दर 3 महिन्यांनी व्याजदरात सुधारणा केली जाते
पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये अर्थ मंत्रालयाकडून  (Ministry of Finance) प्रत्येक 3 महिन्यांनी व्याजदरात सुधारणा करण्यात येते. त्यानंतर नोटिफिकेशन जारी करून याबाबत माहिती दिली जाते. सध्याची चालू तिमाही सलग तिसरी तिमाही आहे ज्यात व्याजदरात कोणतेही बदल केले नाही आहेत.
महत्त्वाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्स आणि त्यावरील व्याजदर
-5 वर्षांसाठी सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीमवर 7.4 टक्के व्याजदर मिळेल. या योजनेत व्याज तिमाही आधारावर दिले जाते. सेव्हिंग डिपॉझिटवर व्याज वार्षिक 4 टक्केच्या हिशोबाने असेल.
-सुकन्या समृद्धी योजनेमध्ये (SSY) 7.6 टक्के दराने व्याज मिळते. 7.6 टक्के व्याज हे चालू आर्थिक वर्षाची तिसरी तिमाही अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबर साठी असेल.
-किसान विकास पत्र (KVP) या योजनेत 6.9 टक्के दराने व्याज मिळते आहे.
-1 ते 5 वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर 5.5 टक्के ते 6.7 टक्के दराने व्याज मिळते आहे.
-5 वर्षांच्या रेकरिंग डिपॉझिटवर 5.8 टक्के दराने व्याज मिळेल.
-नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटवर  6.8 टक्के दराने व्याज  मिळेल
-पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF)वर  तिसऱ्या तिमाहीमध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळेल.