गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (17:00 IST)

गोल्ड बाँड योजना: स्वस्तात सोने खरेदी करण्याची उत्तम संधी

जर आपण स्वस्तात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. ही संधी आपल्या हातातून जाऊ देऊ नका. केंद्र सरकार आता आपल्याला बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. सॉवरेन सुवर्ण बाँड योजनेच्या दहाव्या शृंखलेत, आपण  28 फेब्रुवारी ते 4 मार्च 2022 दरम्यान सोन्यात पैसे गुंतवू शकता. हे सुवर्ण रोखे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे जारी केले जातात .
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते ,सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या दहाव्या मालिकेची इश्यू किंमत 5,109 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी 9व्या मालिकेचे दर 4,786 रुपये प्रति ग्रॅम होते.
 
आपण ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर आपल्याला प्रति ग्रॅम 50 रुपयांच्या सवलतीचाही लाभ मिळेल. याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला  डिजिटल मोडमध्ये पैसे भरावे लागतील.ऑनलाइन पेमेंट केल्यास , गोल्ड बाँडची इश्यू किंमत 5,059 रुपये प्रति ग्रॅम असेल
 
जर आपण  हे बाँड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासोबत व्याजाचाही लाभ मिळेल. केंद्र सरकारकडून तुम्हाला इश्यू किमतीवर 2.5 टक्के व्याजाचा लाभ मिळेल. आपल्याला सरकारकडून सहामाही व्याजाचा लाभ मिळतो.
 
आपण  RBI द्वारे जारी केलेल्या सोन्याच्या बाँडमध्ये 4 किलो पर्यंत खरेदी करू शकता . याशिवाय ट्रस्ट किंवा संस्था 20 किलोपर्यंतचे बाँड खरेदी करू शकतात.
सॉवरेनगोल्ड बाँड हा आरबीआयने जारी केलेला सरकारी बॉन्ड आहे. सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली. सोन्याच्या वजनानुसार आपण ते खरेदी करू शकता. 5 ग्रॅमच्या बॉन्डचे मौद्रिक मूल्य 5 ग्रॅम सोन्याइतके असेल.