बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 12 मार्च 2020 (13:24 IST)

सोने स्वस्त, चांदी वधारली

'कोरोना'च्या प्रकोपाने कमॉडिटी बाजारात उच्चांकी पातळी गाठणार्‍या सोन्याच्या दरात बुधवारी घसरण झाली. दिल्लीत सोन्याचा भाव 516 रुपयांनी घसरून 44517 रुपये झाला. सोन्याचा भाव घसरला असला तरी चांदीचा भाव मात्र वधारला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने 37 रुपयांनी स्वस्त झाले.

सोन्याचा भाव सकाळी 43703 रुपये होता. मंगळवारी सोने आणि चांदी दरात एक टक्क्याची सरण झाली होती. बुधवारी दिल्लीत सोन्याचा भाव 516 रुपयांनी घसरून 44517 रुपये झाला. सोमवारी तो 45033 रुपये होता. चांदीत मात्र 146 रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव 47234 रुपये झाला.