बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (14:36 IST)

सरकार एलपीजी सिलेंडरचे वजन कमी करण्याचा विचार करत आहे

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वजनामुळे होणार्‍या समस्या लक्षात घेता सरकार त्यांचे वजन कमी करण्याचा विचार करत आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलेंडरच्या 14.2 किलो वजनामुळे महिलांना त्याच्या वाहतुकीत अडचणी येतात. हे लक्षात घेऊन त्याचे वजन कमी करण्यासह विविध पर्यायांवर सरकार विचार करत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. 
 
यापूर्वी एका सदस्याने सिलिंडर जड असल्याने महिलांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला होता. याला उत्तर देताना पुरी म्हणाले, "महिला आणि मुलींनी सिलेंडरचे वजन स्वतःहून उचलावे अशी आमची इच्छा नाही आणि आम्ही त्याचे वजन कमी करण्याचा विचार करत आहोत." ते म्हणाले, "आम्ही यावर मार्ग काढू, मग ते असो. 14.2 किलो वजन 5 किलो किंवा अन्य मार्गाने कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,”असे सभागृहातील गदारोळात ते म्हणाले. त्यावेळी 12 विरोधी सदस्य निलंबीत सदस्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत घोषणा देत होते.
 
यापूर्वी अनेक बड्या नेत्यांनी इंधन दर आणि महागाई या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना महागड्या तेलापासून जास्तीत जास्त दिलासा मिळावा यासाठी इंधनाचे दर कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात आणखी कपात करण्याची मागणीही नेत्यांनी केली आहे.