रविवार, 18 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (14:23 IST)

यापुढे 31 डिसेंबरनंतर आयटी रिटर्न भरल्यास 10,000 रु. दंड

income tax return
नव्या करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अरुण जेटलींनी यांच्या बजेटमध्ये एक नवी घोषणा केली आहे. जे करदाता पहिल्यांदा आयकर रिटर्न फाइल करतील त्यांना एका वर्षापर्यंत स्क्रूटनी असणार नाही. तसेच 5 लाखांपर्यंत उत्पन्नधारकांना एक पानी फॉर्म भरुन आयटी रिटर्न भरता येईल. पण जे उशीरा रिर्टन फाइल करतील त्यांना मात्र दंड भरावा लागेल. आयटी रिटर्न जमा करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जर रिटर्न भरल्यास त्यावर 5000 दंड लागणार आहे. तसेच 31 डिसेंबरनंतर आयटी रिटर्न भरल्यास 10,000 रु. दंड लागणार आहे.  ज्यांचे उत्पन्न 5 लाखाहून कमी आहे अशा उत्पन्नधारकांना मात्र, 1,000 दंड बसणार आहे.