रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 25 डिसेंबर 2019 (14:07 IST)

इंडिगोची बंपर ऑफर; 899 रुपांत विमान-प्रवास

एअरलाइन्स कंपनी इंडिगोने नवीन वर्षा आधी एका बंपर सेलची घोषणा केली आहे. 'द बिग फॅट इंडिगो सेल' असे या सेलचे नाव आहे. इंडिगोच्या या ऑफरमध्ये विमान प्रवाशांना अवघ्या 899 रुपयांत प्रवास करता येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना केवळ 2 हजार 999 रुपयांत परदेशवारी करता येऊ शकणार आहे. इंडिगोने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.
 
2019 वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुखद धक्का देण्यासाठी इंडिगोने या बंपर सेलची घोषणा केली आहे. प्रवाशांना स्वस्तात विमान तिकीट मिळावे, यासाठी कंपनीने ही योजना सुरू केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
 
केवळ 899 रुपांत तिकिटाची बुकिंग करता येणार आहे. ही बुकिंग 23 डिसेंबरपासून सुरू झाली आहे, तर 26 डिसेंबर रोजी संपणार आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना 15 जानेवारी 2020 ते 15 एप्रिल 2020 पर्यंत  देशात कोठेही, तसेच परदेशात कोठेही विमान प्रवास करता येणार आहे. इंटरग्लोब अ‍ॅविएशन लिमिटेड (इंडिगो) च्या या सेलमध्ये तिकिटाची बुकिंग 26 डिसेंबर 2019 रोजी 23.59 वाजेर्पंत करता येऊ शकणार आहे. देशभरात किंवा आंतरराष्ट्रीय मार्गावर इंडिगोचे 899 रुपयांत ते 2 हजार 999 रुपयांत तिकीट दर असणार आहे. झीरो कन्व्हिंसिंग फी इंडिगोची वेबसाइट किंवा इंडिगो मोबाइल अ‍ॅप वरून ही बुकिंग करता येऊ शकणार आहे.