महागाईचा भडका !घरगुती सिलेंडर महागला
एलपीजी ने घरगुती गॅस सिलॅन्डर च्या दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे.ही वाढ सबसिडीरहित गॅस सिलेंडर साठी करण्यात आली आहे.आता दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी 859.5 रुपये मोजावे लागणार. कोलकातामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 886 रुपये,मुंबईत गॅस सिलेंडर साठी 859.5 रुपये,लखनौत 897.5 रुपये घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागणार.
घरगुती गॅस सिलेंडर सह 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 68 रुपयांनी वाढले असून दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 1618 रुपये मोजावे लागणार.
लक्षात असू द्या की तेल कंपनी दर महिन्यातील पहिल्या आणि 15 व्या तारखेला एलपीजी गॅसच्या दरांचा आढावा घेऊन किमती ठरवतात.इथे कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉक डाऊन मुळे सर्व सामान्य माणसांचे हालच झाले आहे.सामान्य माणसानं जगावं कसं हा मोठा प्रश्न सामान्य माणसांसमोर उद्भवत आहे.पेट्रोल डिझेलचे दर देखील वाढल्यामुळे लोकांमध्ये रोष आहेच. त्यावर आता घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे केंद्रसरकारला टीकाच्या सामोरी जावे लागत आहे.