शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (17:54 IST)

Tata vs Reliance: सुरु झाली लढाई!

आता भारतातील दोन दिग्गज कंपन्यांमध्ये चुरशीची लढत सुरू झाली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने शुक्रवारी बीएसईवर तब्बल चार टक्यां    नी वाढ झाली आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी खळबळ माजली आहे. टीसीएसचा शेअर ऑल टाईम हाय 3,479.35 रुपयांवर पोहोचला आहे. याआधी या शेअरने 25 जूनला 3399 रुपयांपर्यंत उंची गाठली होती. यामुळे आता टीसीएस कंपनीचे बाजार मूल्य हे 13 लाख कोटी च्या जवळ जाऊन पोचले आहे.
 
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन मुकेश अंबानी आहेत. आता टाटाने यांच्या साम्राज्याला धक्का दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सध्याचे बाजार मूल्य हे 13.53 लाख कोटी रुपये आहे. जिल्ह्यात सध्या भारतातील सर्वात अधिक मूल्य असलेली कंपनी आहे. आता रतन टाटा यांची टीसीएस कंपनी चे बाजार मूल्य आज तब्बल 12.87 लाख कोटी वर पोचले आहे. टीसीएस ने शुक्रवारी सांगितले की, सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला Microsoft Business Applications 2021/2022 Inner Circle साठी निवडण्यात आले आहे.
 
एचडीएफसी सिक्योरिटीजने टीसीएसच्या शेअरसाठी तब्बल 3650 रुपयांचे टार्गेट प्राईस ठेवले आहे. आता पुढे ही कंपनी चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. असे एचडीएफसी नाही आपल्या अधिकृत सांगितले आहे.