मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (09:55 IST)

महागाईचा फटका :दुधाचे दर वाढले

महागाई दिवसंदिवस वाढतच आहे. महागाईचा फटका सर्वसामान्य माणसांना बसत आहे. आता ग्राहकांना प्रतिलिटर दुधामागे 2 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहे. राज्यात दूध संघाने दुधाच्या मागे प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. 15 मार्च पासून हे नवे दर लागू होतील. शेतकऱ्यांकडून जे दूध संघ खरेदी करतात त्या शेतकऱ्यांना आता तीन रुपये वाढवून मिळतील. महानंद, चितळे ,गोवर्धन आणि कात्रज दुधाच्या किमती खरेदी 3 रुपयांनी तर विक्री दर 2 रुपये केले आहे. गायीचे दूध आता 33 रुपये प्रतिलिटर तर पॉली  पॅक दुधाचे दर 52 रुपये प्रतिलिटरच्या दराने मिळणार आहे.