मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (17:23 IST)

महागाईचा दणका, आता चिकन महागलं

दूध, चहा, कॉफी, मॅगी नंतर आता चिकन देखील महाग झाले आहे. महागाईचा फटका आता चिकनला ही बसला असून सर्वसामान्य नागरिकांना सहज परवडणारे चिकन आता महागडे झाले आहे. पूर्वी चिकन 180 ते 200 रुपये किलोच्या दराने मिळणारे चिकन आता 300 रुपये किलोच्या दराने मिळत आहे. त्या मुळे आता एन होळीच्या सणावर चिकन प्रेमींना चिकन महागात पडणार आहे. 
चिकनचे दर पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य, पक्षांच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च वाढल्यामुळे चिकनचे दर वाढले आहे. पोल्ट्रीत लागणारे खाद्याचे दर देखील 3300 च्या पुढे आहे. 
गावरान कोंबड्याचे दर आता 500 रुपये झाले आहे. आता चिकनप्रेमींना महागाईमुळे चिकन आवाक्याच्या बाहेर जाताना दिसत आहे.