मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (13:22 IST)

महागाईचा फटका ! लग्नातील जेवण महागले

Inflation hits! Wedding meals are expensive महागाईचा फटका ! लग्नातील जेवण महागले
कोरोनाचे निर्बंध संपल्यानंतर  एप्रिल ते जून लग्नसराई सुरू आहे. सगळीकडे लग्नाचा जल्लोष सुरू आहे. या वर्षी होणारी लग्ने महागणार आहेत. मॅरेज हॉल आणि बँक्वेट हॉलच्या बुकिंगपासून ते कॅटरिंग आणि कपडे-दागिन्यांपर्यंत सर्व काही महाग झाले आहे. लग्नाच्या खर्चात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे
 
सध्या पेट्रोल, डिझेल, सी,एन जी,पी एन जी, एल पी जी महाग झाले आहे. इंधनाचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भेदले आहे.  खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीचा परिणाम लग्नसराईवर होत आहे. ते 25 टक्क्यांनी महाग झाले आहे.गॅसच्या किमतीपासून ते खाण्यापिण्याच्या वस्तू, मिठाई  महाग होत आहे.या दरवाढीचा फटका सर्वसामान्य माणसांना बसला आहे. 
 
सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या मुळे लग्नाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे आता लग्न कार्य देखील महाग झाले आहे. वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य माणसाला बसला आहे. गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे भाजी पाला, तांदूळ. पीठ वाहतूक खर्च महागले आहे. त्या मुळे आता लग्नाचे जेवण महागले आहे.