शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 10 जुलै 2022 (15:00 IST)

ऑक्टोबरपासून महागाईत घसरणीची शक्यता - गव्हर्नर दास

चालू आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात, ऑक्टोबरपासून किमती स्थिरावू लागतील आणि महागाई संबंधी स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल, असा विश्वास रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शनिवारी व्यक्त केला.
 
मजबूत आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महागाईला रोखण्यासाठी उपाययोजना मध्यवर्ती बँकेकडून सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर जनतेचा विश्वास आणि भरवशाच्या मोजमापाचे परिमाण म्हणून चलनवाढीकडे पाहायला हवे, असे दास यांनी कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन केले.
 
पुरवठय़ाच्या आघाडीवर अनुकूल स्थिती दिसत असून, एप्रिल ते जून २०२२ या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची फेरउभारी दर्शविणारे ठळक निर्देशकांची आकडेवारी पाहता, आर्थिक वर्ष २०२२-२३च्या उत्तरार्धात महागाईत हळूहळू उतार दिसू शकेल, असे मध्यवर्ती बँकेचे अनुमान असल्याचे गव्हर्नरांनी सांगितले.