LPG सिलेंडर होणार स्वस्त
उद्या 1 एप्रिल आहे उद्या पासून नवीन नियम लागू होणार. उद्या भारतीय ग्राहकाला गॅस सिलिंडर स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. देशात 1 तारखे पासून अनेक बदल होतात. पेट्रोल डिझेल पासून गॅस सिलिंडरचे भाव बदलतात. सामान्य नागरिकांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या 400 रुपयांना मिळणारा गॅस 1100 रुपयांना मिळणाऱ्या गॅस च्या किमतीत कपात होऊन आता गॅस 930 रुपयां पर्यंत मिळत आहे.
आता उद्या पासून गॅसच्या किमती अजून कमी होण्याची शक्यता आहे.
मोदी सरकार ने गेल्या वर्षी 29 ऑगस्ट 2023 रोजी मोठी घोषणा केली त्यात उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला.जून मध्ये गॅस सिलिंडर 1100 रुपयांवर पोहोचला गेल्या काही महिन्यात 14.2 किलोच्या सिलेंडर भाव 902.50 रुपये होता. मार्च महिन्यात 100 रुपयांच्या कपातीनंतर गॅस सिलिंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला. तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 एप्रिल रोजी त्यात अजून कपातीचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी घरगुती गॅस मध्ये कपात मिळण्याचे संकेत मिळत आहे.
Edited By- Priya Dixit