मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (07:01 IST)

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वात आधी म्हणजेच जानेवारीपासून ट्रॅव्हल कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या. भारतातील प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनी मेकमायट्रीपलाही त्याचा मोठा फटका बसला आहे. या कंपनीतील तब्बल ३५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे उत्पन्न नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणे कठिण होत असल्यामुळे त्यांनी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यामधील सर्वाधीक कर्मचारी हे आंतरराष्ट्रीय विमान सेवा व इतर संबंधीत कामाशी निगडीत होते. मेकमायट्रीपचे संस्थापक दीप कालरा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मागो यांनी त्या कर्मचाऱ्यांना ई मेलद्वारे राजीनामा देण्यास सांगितले. त्यामध्ये त्यांनी नमूद केले की, परिस्थितीत अजूनही नियंत्रणात नाही. तसेच कोविड-१९ चा प्रवाभ आणखी किती काळ जगावर राहिल हेदेखील सांगता येणे कठिण आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.