सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (09:31 IST)

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन

अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेल्या गिरीश साळवी (५५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुंबईतील वरळीस्थित घरीच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिनेता गिरीश साळवी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावरुनच त्यांनी श्रद्धांजली वाहिली.  आपल्या कामातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळच स्थान निर्माण केलं होतं. लोकप्रिय अशा कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रीक या मालिकेचं शिर्षक गीत गिरीश यांनी लिहिलं होतं. राजेश देशपांडे निर्मित धुडगूड या चित्रपटाची निर्मित्ती साळवी यांनी केली होती. चित्रपट व टेलिव्हिजन मालिका यांपेक्षा ते नाट्य मंचावर अधिक रमले, अनेक एकांकिकांचे दिग्दर्शनही  साळवी यांनी केले