शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 जून 2023 (08:31 IST)

हाऊसिंग कंपनी एचडीएफसी कंपनी, एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण

देशातील सर्वात मोठी हाऊसिंग कंपनी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे १ जुलैपासून विलिनीकरण होणार आहे, अशी माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी फायनान्स एचडीएफसी बँकेचा एक भाग बनेल. विलिनीकरणासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून ३० जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बोर्डाची या प्रक्रियेसाठीची अखेरची बैठक पार पडणार आहे.
 
एचडीएफसी कंपनी १३ जुलैपासून ‘एचडीएफसी बँक नावाने आपले शेअर ट्रेड करणार असल्याची माहितीदेखील एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली. एचडीएफसी बँकेने गेल्या वर्षी ४ एप्रिल रोजी एचडीएफसीचे अधिग्रहण करण्याचे मान्य केले होते. लवकरच होणा-या प्रस्तावित संस्थेची एकत्रित मालमत्ता सुमारे १८ लाख कोटी रुपयांची असेल. एचडीएफसी बँक आणि एचडीएसएफ लिमिटेड यांच्या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक ही जगातील पाचवी सर्वात मोठी बँक बनेल. एप्रिल २०२३ पर्यंत एचडीएफसी बँक जगातील मार्केट कॅपमध्ये अकराव्या क्रमांकावर होती.

Edited By - Ratnadeep ranshoor