बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जून 2020 (22:03 IST)

सरकारकडून गरीब कल्याण योजनेबाबत महत्त्वाच्या घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीब कल्याण योजनेबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात ६ राज्यांमधील जवळपास ११६ जिल्ह्यांमध्ये शहरांमधून सर्वाधिक मजूर परतले आहेत. या मजुरांच्या कौशल्याचा, त्यांच्या कामाचा तपशील केंद्राकडे असून त्या दृष्टीनं आखणीही करण्यात आली आहे. ज्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी खडगिया जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात करणार आहेत. २० जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण रोजगार अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. 
 
सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार या श्रमिक १२५ दिवसांसाठी विविध प्रकल्पांवर काम करतील. त्यांची कौशल्य पाहता विहिरी खोदणं, रस्तेबांधणी करणं, इमारत बांधणीची कामं करणं आदी कामे दिली जातील. 
 
गरीब कल्याण योजनेअंतर्गत १२५ दिवसांमध्ये सरकारच्या जवळपास २५ योजनांना एकत्र आणलं जाणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक योजनेला मजुरांना कशा प्रकारे फायदा होईल यावर भर दिला जाईल.