गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (10:57 IST)

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ, आजचे दर जाणून घ्या

तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 28 ते 32 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही 33 ते 37 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 99.41 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.77 रुपये प्रति लिटर मिळत आहे. 
 
मुंबईत पेट्रोलचा दर 114.19 रुपये आणि डिझेलचा दर 98.50 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 108.85 रुपये आहे तर डिझेलची किंमत 93.92 रुपये प्रति लीटर आहे. तर, चेन्नईमध्येही पेट्रोल 105.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.33 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. 
 
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 112 डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
 
मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जमू-काश्मीर आणि लडाख येथे पेट्रोल 100  रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.