मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जून 2021 (10:48 IST)

Petrol Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईची आग पुन्हा पेटली, जाणून घ्या आजचे ताजे दर

Petrol Diesel Price Today 29th June 2021: एका दिवसाच्या आरामानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लागलेल्या आगीत आज पुन्हा भडकले. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या नव्या दराप्रमाणे आज, पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलमध्येही 28 पैशांची वाढ झाली आहे. मंगळवारी दिल्लीतील इंडियन ऑइल पंपांवर पेट्रोल 98.81 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.18 रुपये दराने विकले जात आहे. गेल्या मे महिन्यापासून गेल्या काही दिवसांत पेट्रोल 8.49 रुपयांनी तर डिझेल 8.39 रुपयांनी महागले आहे.