गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (09:54 IST)

पेट्रोल-डिझेलचा पुन्हा उडणार भडका?

petrol diesel
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत घट होत आहे. मात्र लवकरच इंधन दर पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.
 
तेल निर्यातदार देश उत्पादन की करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे लवकरच इंधनाचे दर वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढाल सुरू होताच ब्रेंट क्रूड ऑइलचा प्रतिबॅरल दर 70.69 डॉलर इतका होता. शुक्रवारी हाच दर 70 डॉलरच्या खाली होता. काल खनिज तेलाचा दर 71.61 डॉलर इतका होता. ही आकडेवारी पाहिल्यास येत्या काही दिवसात इंधनदरात वाढ होऊ शकते. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्याने इंधन दरात मोठी वाढ होईल, अशी शक्यता होती. इराणशी व्यापारी संबंध कायम ठेवणार्‍या देशांवर अमेरिका बहिष्कार टाकेल, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली होती.