1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. Domestic gas prices have increased by 2 rupees

घरगुती गॅसच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ

घरगुती गॅस एलपीजीच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. सरकाने एलपीजी डिलर्सच्या कमीशनमध्ये वाढ केल्यानंतर ही दरवाढ झालीयं. इंधन कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या सबसिडीवाल्या एलपीजी सिलेंडरची किंमत 507.42 रुपये इतकी झाली आहे. याआधी ही किंमत 505.34 रुपये होती. दरवाढ होण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. पेट्रोलियम मंत्रालयने डिलर कमीशन वाढविण्याचे आदेश दिले होते. 14.2 किलो आणि 5 किलो च्या सिलेंडरवरील घरगूती एलपीजी वितरकांच्या कमीशनमध्ये सप्टेंबर 2017 मध्ये क्रमश : 48.98 रुपये आणि 24.20 रुपये निश्चित केले होते.
 
मुंबईत 14.2 किलो च्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 505.05 रुपये झालीयं. कोलकातामध्ये 510.70 इतकी तर चेन्नईमध्ये 495.39 रुपये आहे. वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक कर तसेच परिवहन कर यावर या किंमती बदलत जात असतात. 
पुढील लेख
धक्कादायक माहिती: अवनीला शुद्धीचं इंजेक्शन लागलं नाही