रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:50 IST)

पीएमसी बँक घोटाळा : हितेंद्र ठाकूर यांच्या ग्रुपवर ईडीचे छापे

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रुपच्या वसई आणि मीरा-भाईंदर परिसरातील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले.
 
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी ठाकूर कुटुंबीयाचे आर्थिक संबंध असून त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला आहे.
 
यावर प्रतिक्रिया देताना ठाकूर यांनी म्हटलं, "ईडीचे अधिकारी आले असून ते चौकशी करतील. ईडी माझ्यामागे लागण्याइतका मी मोठा नेता नाही. पण, या चौकशीमुळे उद्या वर्तमानपत्रात नाव येईल. आज मी वाहिन्यांवरही दिसत आहे. त्यामुळे मोठे होण्याची संधी मला मिळाली."