मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (11:03 IST)

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, होऊ शकत स्वस्त

सरकारी तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. आज, शुक्रवारी सलग 12 व्या दिवशी, सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
 
5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना 15 पैशांची सवलत दिली होती. तेव्हापासून किमती स्थिर आहेत. IOCL च्या मते, देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.19 रुपये आणि डिझेलची किंमत 88.62 रुपये प्रति लीटर आहे.