शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

लोकसहभाग वाढविण्यासाठी रेल्वे पुरस्कार देणार

रेल्वे डब्यांची प्रवासी क्षमता वाढवणे, रेल्वे स्थानकावर डिजिटल सुविधा पुरवणे तसेच कमी उंचीच्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वेत चढणे-उतरणे यावर नागरिकांनी मत मांडण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. त्याचबरोबर प्रभावी पद्धतीने मालगाड्यात माल ठेवण्यासाठी वॅगनच्या नवा डिझाईनसहित विविध मुद्दयांवर नाविन्यपूर्ण कल्पनेलाही १२ लाख रूपयांचे सहा पुरस्कार देण्यात येणार आहे. 
 
या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रक्रिया, नियम, अटी, पात्रतेबाबत इनोव्हेट डॉट मायगव्ह डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २० डिसेंबर अंतिम तारीख आहे.