रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, 2 वर्षांनंतर आता पुन्हा रेल्वे देणार ब्लँकेट-शीट
भारतीय रेल्वेने ही मोठी सुविधा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरेतर, रेल्वे मंत्रालयाने पुन्हा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना ब्लँकेट आणि बेडिंग देण्याची घोषणा केली आहे.
भारतीय रेल्वेने मार्च-2020 पासून प्रवाशांना चादर, उशा आणि ब्लँकेट देणे बंद केले होते. कोरोना महामारीमुळे प्रवाशांना ही सुविधा मिळत नव्हती. मात्र आता ही सेवा तातडीने लागू करण्याची घोषणा रेल्वेने केली आहे. म्हणजेच आजपासून प्रवाशांना प्रवासादरम्यान ब्लँकेट आणि चादर मिळणार आहेत.
यासाठी, रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना दिलेल्या आदेशात या वस्तूंचा पुरवठा त्वरित प्रभावाने पुन्हा सुरू करण्यात यावा, असे म्हटले आहे.