शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 6 जून 2018 (11:21 IST)

शिल्पा शेट्टीच्या पतीची ईडीकडून चौकशी

raj kundra
बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे कुंद्रा आता ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. त्यांचा कबुली जबाब नोंदविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
बिटकॉइन घोटाळ्याप्रकरणी अमित भारद्वाज याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. त्याने gatbitcoin.com नावाने एक वेबसाईट तयार करून अनेकांची फसवणूक केली होती.