गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (09:28 IST)

आरबीआयकडून बँक ऑफ इंडियावर निर्बंध

बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकले आहेत. हा बॅंक ऑफ इंडियासाठी मोठा फटका मानला जात आहे. बँकेची वाईट कर्ज सातत्यानं वाढत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे RBIनं योग्य प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं बँक ऑफ इंडियानं मुंबई शेअर बाजाराला कळवलं आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून वाढत असलेला NPA आणि मालमत्तेच्या परताव्याचे उणेमध्ये असलेला आकडा यामुळे ही कारवाई करण्यात आलीये. यामुळे रिस्क मॅनेजमेंट, अॅसेट क्वालिटी, नफा, कार्यक्षमता यामध्ये सुधारणा होईल, असं बँकेनं कळवलंय. मार्च २०१७ मध्ये बँकेचा NPAमध्ये १३.२२ टक्क्यांची वाढ झाली आहे.