रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2019 (10:07 IST)

दहा रुपयात खाते सोबत बचत आणि बंकेपेक्षा अधिक व्याज वाचा सविस्तर

पोस्ट ऑफिस आपल्याला फक्त पत्र व्यवहार न देता अनेक सुविधा देते. पोस्टात गुंतवलेले पैसेही चांगला परतावा मिळवून देतात आणि सर्वात सुरक्षित देखील आहेत. आता पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. फक्त केवळ १० रुपयांमध्ये खातं उघडता येणार असून, पोस्टातील बचत योजनांपैकी आर.डी. (Recurring Deposit) ही एक लोकप्रिय योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करणे ही सर्वात सोपी असते, इतर बचत योजनांच्या तुलनेत येथे ठेवींवर अधिक व्याज देखील दिले जाते. आरडी योजनेत ग्राहकांना मासिक हप्ते ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध केली असून, ऑनलाईन हप्ते भरण्यासाठी पोस्ट ऑफिसने पोस्ट पेमेंट्स बँकेत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आरडी खात्यातून पोस्ट ऑफिसवर ग्राहकांना आयपीपीबीशी (IPPB) लींक करावे लागेल. त्यानंतर आरडीची मासिक हप्ता ऑनलाइन आयपीपीबी खात्यातून किंवा आयपीपीबी अ‍ॅप (IPPB App) कडून अदा केली जाऊ शकते.आरडी योजनेचे फायदे आरडी गुंतवणूकदाराच्या बचतीवर अवलंबून असते आणि त्यात दरमहा निश्चित रक्कम गुंतवता येते. आरडीच्या लॉक इन फीचर ; नुसार सुरुवातीपासून अंतिम मुदतीपर्यंत व्याजदर समान राहतो. डिपॉजिटवर व्याजदर सुरुवातीला लॉक इन  होऊन जातो. म्हणजेच व्याजदर कमी असेल तर आरडीचा फायदा होतो.  आरडी मधील खाते उघडताना कालावधी निश्चित केली जाते. कालावधी पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला व्याजासहित रक्कम मिळते. आरडीची मदत १० वर्षांपर्यंत असू शकते. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक योजना बनविली जाऊ शकते. देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया आरडीवर ६. ८० ते ६. ८५ % व्याज देते. तर पोस्ट ऑफिस दरवर्षी ७. ३० % व्याज देते. पोस्ट ऑफिसमध्ये आरडीचा कालावधी ५ वर्ष असेल तर बँकामध्ये तुम्ही तो १ ते १० वर्ष निवडू शकता.असे उघडा खाते पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खोलने खूप सोपे आहे. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही आरडी उघडू शकता. त्यामध्ये तुम्ही एक किंवा अधिक खाती उघडू शकता. हे खाते लहान मुलांच्या नावेही उघडता येते. १० किंवा त्यापेक्षा अधिक वय असणारी मुले स्वतः हे खाते वापरू शकता. तसेच आरडीमध्ये जॉईंट अकाउंटही उघडता येते.