शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

निवडणूक निकाल: सेन्सेक्स 40 हजाराच्या पार

लोकसभा निवडणुकीचे कौल भाजपच्या बाजूने येऊ लागल्याने शेअर बाजारानेही मोठी उसळी घेतली आहे. आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने 40 हजाराचा आकडा पार केला तसेच निफ्टी 11904.15 चा आकडा गाठला. 
 
आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला असून निफ्टीने 150 अंकाची उसळी घेतली आहे. सुरुवातीच्या 15  मिनिटातच शेअर बाजार 800 अंकाने वधारून 39850 वर पोहोचला. 
 
यापूर्वी 21 मे रोजी एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्स 39571 अंकावर पोहोचला होता. तर निफ्टी 200 अंकांनी वाढून 11,930 वर गेला होता. त्यामुळे आज निफ्टी 12  हजाराचा पल्ला गाठेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
निफ्टी (Nifty) टॉप गेनर -
IndusInd Bank 
Indiabulls Hsg  
SBI 
Adani Ports
Zee Entertain