रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2020 (15:11 IST)

Jio ऑफर ‘फ्री’मध्ये मिळतोय 2GB एक्स्ट्रा डेटा

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (reliance Jio Free Data Offer)आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर पुन्हा एकदा आणली असून याअंतर्गत ग्राहकांना मोफत हाय स्पीड डेटा देत आहे. सलग चौथ्या महिन्यात कंपनीकडून अखेरच्या चार दिवसांसाठी दररोज 2 जीबी फ्री डेटा दिला जात आहे. यापूर्वी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यातही कंपनीने ही ऑफर आणली होती.
 
ही ऑफर आधीप्रमाणेच चार दिवसांच्या वैधतेसह आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा म्हणजे एकूण 8 जीबी डेटा अगदी मोफत दिला जात आहे. जर तुमच्या सध्याच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा वापरण्यास मिळत असेल तर या ऑफरनुसार अखेरचे चार दिवस तुम्हाला 2 जीबीऐवजी 4 (2+2) जीबी डेटा मिळेल. पण, ही ऑफर कंपनीकडून काही निवडक ग्राहकांनाच दिली जातेय.
 
या ऑफरसाठी ग्राहकांची (reliance Jio Free Data Offer)‘रँडम’निवड केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेलच हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, युजर्स My Jio अ‍ॅपमध्ये जाऊन जिओ डेटा पॅकच्या उपलब्धता चेक करु शकता. जिओ कस्टमर्स MyJio अॅपवर जाऊन ही ऑफर त्यांना लागू होते की नाही याची माहिती घेऊ शकतात. इथे तुम्हाला डेटा पॅक टायटलमध्ये डीटेल्स दिसतील. जर तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळाला असेल तर तुमच्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनसोबत अतिरिक्त डेटाही दिसेल