अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व बँकेकडून व्याजदरात कपात

reserve bank of india
Last Modified शनिवार, 23 मे 2020 (09:54 IST)
कोविड19 ची महामारी आणि प्रतिबंधासाठीचा लॉकडाऊन याच्या फटक्यातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेनं
व्याजदरात कपात केली, कर्ज परतफेडीची मुदत वाढवायला परवानगी दिली आणि उद्योगांना अधिक पतपुरवठा करण्याची मुभा बँकांना दिली. रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. बँकेच्या वित्तधोरण समितीची बैठक झाल्यानंतर ते बोलत होते.

रेपो दरात ४ दशांश टक्के कपात करुन तो ४ टक्के केला आहे तर रिव्हर्स रेपो दर पावणेचार टक्क्यांवरुन ३ पूर्णांक ३५ शतांश टक्के केला आहे. यापूर्वी २७ मार्चला जाहीर झालेल्या आढाव्यात रिझर्व बँकेनं व्याजदरात ७५ बेसिस अंकांची, अर्थात पाऊण टक्के कपात केली होती. सर्व प्रकारच्या कर्जांचे हप्ते पुढचे ३ महिने लांबणीवर टाकायची परवानगी बँकांना दिली आहे.

सहा महिन्यात न भरलेले हप्ते एकत्र करुन वेगळ्या कर्जात रुपांतरित करता येतील.
उद्योगांसाठीच्या कर्जाची मर्यादा २५ वरुन ३० टक्क्यापर्यंत वाढवली आहे.

चालू आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा दर उणे, अर्थात शून्याच्या खाली राहील, असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे. कोविड19 ची साथ आणि कडधान्यांची भाववाढ यामुळे चलनफुगवट्याबाबत अनिश्चितता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. भाव आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने आयात शुल्काचा फेरविचार करावा लागेल असं ते म्हणाले.

आयात निर्यातीला चालना देण्यासाठी एग्झिम बँकेला १५ हजार कोटी रुपयांचा जादा पतपुरवठा देण्याची घोषणाही दास यांनी केली.

पहिल्या सहामाहीत चलनफुगवटा वाढता राहण्याची, आणि नंतरच्या काळात ४ टक्क्यांच्या खाली घसरण्याची शक्यता दास यांनी व्यक्त केली.

कोविड19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवणाऱ्या परिस्थतीवर रिझर्व बँकेचं सतत लक्ष असून कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायची तयारी आहे असं ते म्हणाले.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत कंडोमचं वाटप
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वात आधी म्हणजेच जानेवारीपासून ट्रॅव्हल कंपन्या बंद ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय करतात ?
मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे नेता म्हणून राज ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे  मृत्यू
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन ...