गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (12:01 IST)

SBI च्या 44 कोटी खातेदारांसाठी खास बातमी, घरून फक्त 5 मिनिटात ATM पिन तयार करा

जर आपले खाते देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) मध्ये आहे तर ही बातमी आपल्यासाठी आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता आपल्या डेबिट कार्ड किंवा एटीएम पिन जेनरेट करण्यासाठी एटीएम मशीनपर्यंत धावण्याची गरजी नाही. आपण घरी बसल्या केवळ 5 मिनिटात आपलं एटीएम पिन जेनरेट करु शकतात. बॅकने स्वत: ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे.
 
या प्रकारे करा ATM पिन जेनरेट
SBI खाताधारक घरी बसल्या ऑनलाइन पद्धतीने आपलं ATM पिन जनरेट करु शकतात. यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. बँकेने ट्वीट करुन आपल्या ग्राहकांना या ग्रीन पिन बद्दल माहिती दिली आहे. बँकेने आपल्या कस्टमर्सची सुविधा लक्षात घेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने आपलं ग्रीन पिन जेनरेट करण्याची सुविधा दिली आहे. ग्रीन पिन जेनरेट कसे करावी हे आम्ही आपल्याला सांगत आहोत.
 
SBI ग्रीन पिन या प्रकारे करा जेनरेट
SBI ने ट्वीट करुन खाताधारकांना ग्रीन पिन जेनरेट करण्यासंबंधी माहिती दिली आहे. पहिल्या पद्धतीत आपण बँकेच्या टोल-फ्री IVR सिस्टमच्या मदतीने पिन जेनरेट करु शकतात. 
 
यासाठी आपल्याला आपल्या रजिस्टर्ड फोन नंबरने बँकेच्या टोल फ्री नंबर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करावा लागेल. फोनवर आपल्याला आवश्यक दिशानिर्देश पाळावे लागतील. फोनवर मागितलेल्या माहितीप्रमाणे क्रमांक दाबावे लागतील. नंतर आपल्याला आपल्या एटीएम कार्डाचे अंतिम 5 अंक दर्ज करण्यासाठी सांगितले जाईल. नंतर आपल्या बँक खात्याचे अंतिम 5 नंबर नोंदण्यासाठी सांगितले जाईल. मग आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ नोंदवावी लागेल. हे दिशनिर्देश पाळत आपण आपलं एटीएम पिन सोप्या पद्धतीने जेनरेट करु शकतात.
 
एसएमएस द्वारे बदला आपले पिन
आपण एसएमएस द्वारे आपलं एटीएम पिन बदलू शकता. यासाठी आपल्याला आपल्या बँक खात्यात रजिस्डर्ड मोबाइल नंबर द्वारे 'PIN एटीएम कार्ड वर अंकित शेवटले 4 अंक नंतर बँक खात्यातील शेवटले 4 नंबर लिहून 567676 यावर मेसेज पाठवावा लागेल. यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, जे आपल्याला एसबीआयच्या एटीएमवर जाऊन नोंदवावे लागेल.