शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (14:10 IST)

टाटा समूहाला झटका : मिस्त्री हेच टाटा समूहाचे अध्यक्ष

Shock to Tata group: Mistry is the president of Tata group
कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठे बोर्डरूम बॅटल ठरलेल्या सायरस मिस्त्री आणि टाटा सन्नमधील संघर्षात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने सारस मिस्त्री यांच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय दिला. मिस्त्री हेच टाटा समूहाचे अध्यक्ष असल्याचा निर्णय लवादाने दिला.
 
नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून केलेली निवड बेकायदा असल्याचा ऐतिहासिक निर्णय लवादाने दिला आहे. टाटा समूहाविरोधात तीन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर मिस्त्री यांना अखेर न्याय मिळाला आहे.
 
सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा समूहातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती.
 
टाटा समूहातील सुशासनाचा आग्रह धरणार्‍या मिस्त्री यांनी विश्वस्तांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर मिस्त्री आणि टाटा सन्स यच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठली होती. दोन्ही बाजूंनी न्यायालयात आणि कंपनी कायदा लवादाकडे दाद मागण्यात आली.
 
या संघर्षात कधी मिस्त्री तर कधी टाटा समूहाची सरशी झाली, मात्र गेल्या वर्षभरापासून हे प्रकरण कंपनी कायदा लवादाकडे प्रलंबित होते.