बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (16:30 IST)

जाणून घेऊया 200 रुपयांपर्यंचे सर्वोत्तम प्लॅन्स

200 रुपयांपर्यंचा सर्वात स्वस्त प्लॅन रिलायंस जिओचा आहे. जिओने 129 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. जिओ ते जिओ नेटवर्कवर कॉलिंग मोफत आहे. जिओच्या तुलनेत एअरटेलचा 148 रुपांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्येही 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात.
 
तसेच एअरटेल ते एअरटेल कॉलिंग मोफत आहे. तर व्होडाफोनचाही 149 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये एअरटेलच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सुविधा मिळतात. म्हणजेच, एअरटेलच्या 148 आणि व्होडाफोनच्या 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा जिओच्या 129 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांची जवळपास 15 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.