मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2019 (09:59 IST)

पीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचं सहकार्याचं आश्वासन

Movement outside PMC's account holders
रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे खातेदारांना पैसे काढण्यासाठी त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
 
याच पार्श्वभूमीवर पीएमसीच्या संतप्त खातेदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खासगी निवासस्थानी धडक देत आंदोलन केले. यावेळी मातोश्रीबाहेर हजारो खातेदार जमा झाले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली.
 
यानंतर पीएमसीच्या बँकेच्या दोन प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना धीर दिला. तसेच सरकार म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करेन असे आश्वासन दिले. तसेच पुढील चर्चेसाठी 21 आणि 22 डिसेंबर अशी तारीख देण्यात आली आहे.