बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

दोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याना आता दोन महिन्यांऐवजी सहा महिन्यांची ‘फ्री’ पास देण्याचा निर्णय राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. 
 
रा.प. महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या ऐच्छिक स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या आणि वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याना सलग दोन महिने ‘फ्री’ पास दिली जात असे. दोन महिन्यांच्या कालावधीत प्रवास पूर्ण होत नसल्याने फ्री पासची मुदत सहा महिने करण्यात यावी, अशी मागणी एसटीतील विविध कर्मचारी संघटनांनी केली होती. संघटनेच्या मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री आणि रा. प. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मान्य केली आहे.