बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नाशिक , गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (09:05 IST)

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक व निर्यातीवर लवकरच सबसिडी ग्वाही

कांदयाच्या भावाने तळ गाठल्यामुळे जिल्हयांतील कांदा उत्पादक षेतकरी हवालदिल झाले आहे. भावात सतत होणा-या घसरणेची खासदार हेमंत गोडसे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी आज एका षिश्टमंडळासह केंद्रीय कृशीमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेत कांदयाच्या भावात होणारी घसरण थांबविण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याची आग्रही मागणी केली.कांदयांच्या भावात सुधारणा होण्यासाठी वाहतूक खर्च आणि निर्यातीवर केंद्र सरकारकडून लवकरच सबसिडी देण्यात येणार असल्याची ग्वाही नामदार राधामोहन सिंग यांनी दिली आहे. 
 
गेल्या तीन महिन्यापासुन कांदयांच्या भावात रोज घसरण होत आहे. आजमितीस कांदा विक्रीतून लागवड खर्चही निघत नसल्याने षेतकरी उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे.जिल्हयातील षेतकरी रस्त्यांत कांदा फेकत केंद्र षासनाच्या धोरणाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.याची दखल घेत खासदार गोडसे यांनी आज एका षिश्टमंडळासह केंद्रीय कृशीमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेतली.कांदयाला मिळणा-या कवडीमोल भावामुळे जिल्हयातील षेतकरी देषोधडीला लागला असून या जीवघेण्या संकटातून षेतक-यांना बाहेर काढण्यासाठी केंद्राने तातडीने उपाय योजना करावी अषी आग्रही मागणी गोडसे यांनी यावेळी केली.कांदयांच्या भावात झालेल्या घसरणी विशयी नामदार राधामोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करत लवकरच कांदयांच्या वाहतूक आणि निर्यातीवर सबसिडीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही राधामोहन सिंग यांनी षिश्टमंडळाला दिली.षिश्टमंडळात खासदार हेमंत गोडसे,आमदार अनिल कदम,लासलगांव कृशी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आदि मान्यवर उपस्थित होते.