1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’कडून मानांकनात सुधारणा नाही

अर्थ क्षेत्रातील अग्रगण्य मानांकन संस्था असलेल्या ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’ने (एस अॅण्ड पी) यंदाही भारताच्या मानांकनात कोणतीही सुधारणा केलेली नाही. ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’कडून भारताचे BBB- मानांकन कायम ठेवण्यात आले आहे. मात्र येणारा काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगला असेल, असे भाकीत मानांकन संस्थेने वर्तवले आहे. याबाबत  ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
२०१८ ते २०२० या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असा अंदाज ‘स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स’कडून वर्तवण्यात आला आहे. भारताकडे असणारी परकीय चलनाची गंगाजळी या काळात वाढेल, असेदेखील संस्थेने अहवालात नमूद केले आहे. 
 
‘एस अॅण्ड पी’ने याआधी जानेवारी २००७ मध्ये भारताच्या मानांकनात सुधारणा केली होती. त्यावेळी संस्थेने भारताच्या मानांकनात वाढ करुन ते BBB- केले होते. BBB- गुंतवणूक क्षेत्रातील निच्चांकी मानांकन मानले जाते. त्यावेळी संस्थेने भारतीय अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हटले होते. यानंतर २००९ मध्ये ‘एस अॅण्ड पी’ने भारतीय अर्थव्यवस्थेला नकारात्मक शेरा दिला. यानंतर पुन्हा २०१० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिर असा शेरा मिळाला. २०१२ मध्ये पुन्हा भारताला नकारात्मक शेरा देण्यात आला.