शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (13:13 IST)

टाटा समूह यंदा 40 हजार फ्रेशर्सना देणार नोकरी

देशातील सर्वांत मोठ्या आयटी कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) यंदाच्या आर्थिक वर्षात 40 हजारांहून अधिक फ्रेशर्सना महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या माध्यमातून नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
टाटा ग्रूपच्या मालकीची टीसीएस कंपनी खासगी क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
 
"कोरोनाचं संकट असतानाही नवे कर्मचारी दाखल करुन घेण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही. गेल्या वर्षी कर्मचारी भरती प्रक्रियेत एकूण 3 लाख 60 हजार फ्रेशर्सनं नशीब आजमावलं होतं.
 
"यात गेल्यावर्षी देखील कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून 40 हजारांहून अधिक जणांना नोकरीची संधी देण्यात आली होती. यंदाही याच प्रमाणात संधी दिली जाईल", असं कंपनीचे ग्लोबल ह्यूमन रिसोर्स चीफ मिलिंद लक्कड म्हणाले.