बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (22:03 IST)

SBI आणि BoB द्वारे स्वस्तात घर खरेदी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण; जाणून घ्या

स्वतःच असे सुंदर घर घेण्याचे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. यासाठी स्वस्त दरात उत्तम घर घेण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक जाहिराती देखील दिल्या जातात. परंतु अनेकदा काही कारणामुळे नागरिकांची फसवणूक देखील केले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीओबी अर्थात बँक ऑफ बरोडा या दोन बँकांनी आपल्याकडील घरांचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
 
ऑनलाईन मालमत्तांच्या लिलावामध्ये सहभागी होण्यापूर्वी याबाबी लक्षात घ्या. बँका कर्जाच्या वसुलीसाठी हा लिलाव करत असल्यामुळे अशा मालमत्ता बाजारभावापेक्षा फार कमी किंमतीत मिळू शकतात. लिलावात खरेदी होणाऱ्या मालमत्तांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण व्हायला जास्त कालावधी लागतो. कधीकधी हा कालावधी १ वर्षाचा देखील असू शकतो. मालमत्ता आपल्या ताब्यात यायला उशीर झाल्यास तोपर्यंत मालमत्तेमध्ये दुरुस्ती-डागडुजीची कामं निघू शकतात.
 
या कामांसाठी आपल्याला नंतर पैसा लावावा लागतो. काही ठिकाणी मालमत्तांवर आधीपासून काही देणी शिल्लक असतात. उदा. मेंटेनन्स, मालमत्ता कर इ. ही देणी नंतर मालमत्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकाला चुकती करावी लागतात. लिलावातील मालमत्तामध्ये टायटल क्लीअर अर्थात कागदपत्र व्यवस्थित असल्याचा समज ग्राहकांचा होतो. मात्र, अशा व्वहारांत एक कलम बँकांकडून टाकण्यात येतं. यात व्यवहारानंतर त्या मालमत्तेवर इतर कुणी दावा केला तर त्यासाठी बँक जबाबदार राहत नाही. त्यामुळे खरेदीच्या वेळीच या गोष्टींची खातरजमा करणं आवश्यक ठरतं.